‘सत्यशोधक चळवळीतील जुनी कागदपत्रे’ या ग्रंथाकडे केवळ साधनसामग्री म्हणून पाहता कामा नये, हा सत्यशोधक समाजाची वाटचाल दाखवणारा राजमार्ग आहे
सत्यशोधक समाजाच्या एकत्रित इतिहास आजपर्यंत लिहिला गेलेला नाही. याही कागदपत्रांतून संपूर्ण इतिहास समोर येतोच असे नाही. एक मात्र आहे, ज्या वेळी हा इतिहास लिहिला जाईल, त्या वेळी अस्सल साधने म्हणून सदरहू ग्रंथाचा उपयोग केल्याशिवाय अभ्यासकांना पुढे जाता येणार नाही. फक्त अस्सल कागदपत्रे म्हणून या ग्रंथाकडे पाहता येणार नाही, कारण प्रत्येक घटना-प्रसंगामागची कारणमीमांसा संपादकांनी विदित केलेली आहे.......